पोस्ट्स

आठवणीतली माणसं - 15

इमेज
एक अलौकिक प्रतिभावंत व अफाट प्राध्यापक - गुरूवर्य डाॅ. पी.जी.कुलकर्णी सर मी 1963/64 एस.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण झालो.त्या काळात डिस्टींग्क्षणचे गुण मिळाले. आता पुढे कुठे शिकायला जायचे त्याची घरी चर्चा सुरू झाली. माझ्या काकांनी सांगितले की, तू काॅमर्स शाखेला जा.पण जवळ काॅलेज नव्हते. मे महिना संपत आला आणि अचानक एक आनंदाची बातमी आली की,येत्या जून महिन्यापासून गडहिग्लजला "कला आणि वाणिज्य "महाविद्यालय सुरू होणार आहे. खूप आनंद झाला .शेवटी "काॅमर्स "शाखेला प्रवेश घेतला. मोजक्या मुलांनी प्रवेश घेतला. काॅमर्स शाखेला मुली नव्हत्या. एम.आर.हायस्कूलच्या इमारतीत सकाळचे वर्ग भरणार होते. प्राध्यापक वर्गही नवीन होता.प्राचार्य म्हणून ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक, प्राध्यापक अरविंद याळगी सर यांची नेमणूक झाली. ते माझ्या काकांचे मित्र. जून 15 ला काॅलेज सुरू झाले. नव्याचे नऊ दिवस संपले. आणि अभ्यास सुरू झाला. पण दोन महिने झाले तरी "अकौंटन्सी "विषयाला प्राध्यापक च मिळेना. हा विषय शिकवण्याकरीता " चार्टर्ड अकौंटंट "चीच नेमणूक केली पाहिजे ही विद्यापीठाची अट होती. अशी माणसे त्य...

आठवणीतली माणसं - 14

इमेज
त्वमेव बंधु, सखा त्वमेव - श्री.टी.के.पाटील!      आपल्या आयुष्याचा जमाखर्च आपण कधी तरी करून पहावा. तेव्हा समजते की काय मिळविले,काय गमावले आणि हाती काय राहिले.मी अलीकडे असा विचार करत असतो.पैसा,स्थावर संपत्ती,यापेक्षा जिव्हाळ्याची माणसे किती.आणि लक्षात येते की आपले आयुष्य खरोखरच सार्थकी लागलं.कारण आपण लाख मोलाची माणसं मिळवली. सुप्रसिद्ध कीर्तनकार बाबामहाराज सातारकर हे एका कीर्तनात "जिवलग" शब्दाबद्दल ते म्हणाले, "जीवासोबत जो राहतो,असतो तो जिवलग .आपल्या आयुष्यात ही नात्याची ,रक्ताची माणसं सोडून कांही माणसं "जिवालगत"असतात .त्यांना आपल्या आयुष्यात फार मोठे स्थान असते. म्हणून ती जिवलग बनून जातात. अशा माणसांना आपल्या आयुष्यात एक वेगळे स्थान असते.आपल्या सुखदुःखात, ही आपल्याशी समरस असतात .किंबहुना याच्यापेक्षाही अधिक कांही तरी यांच्याजवळ असते. हे असे नाते असते की निरागस ,निष्पाप भावनांचा तो कल्लोळ असतो.एकमेकांशी निरपेक्ष आत्मियता असते.त्यांच्याशिवाय जीवनाला अर्थ प्राप्त होत नाही. अशी फारथोडी माणसे असतात. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच. अशा मोजक्या माणसातील एक म्हण...

आठवणीतली माणसं ‐ 13

इमेज
ध्येयवादी शिक्षकाचे मूर्तीमंत प्रतीक असणारे - गुरूवर्य सी.एम.कुलकर्णी सर      आमचा माध्यमिक शिक्षणाचा काळ हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा पहिल्या दशकाचा काळ होता.म.गांधीजींनी त्याकाळातील तरूणांना आदेश दिला की, खरा भारत खेड्यात आहे.म्हणून तुम्ही खेड्याकडे चला. त्याप्रमाणे गांधीजींच्या विचारानेच प्रभावित झालेली शेकडो तरूण मंडळी खेड्याकडे निघाली.त्यातली काही शिक्षण क्षेत्रात गेली. अशा शिक्षण क्षेत्रातील मंडळीनी आमचे आयुष्य ही बदलून टाकले.आपले शुद्ध आचरण,ज्ञानलालसा, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे आमचे आदर्श बनले. अशा आदर्शापैकी एक म्हणजे आदरणीय सी.एम.कुलकर्णी सर होत. सरांची आठवण निघाली की मला एक फार छान कविता आठवते. गाणेच म्हणा ना. साधारण पन्नासवर्षापूर्वी पुण्यातल्या महर्षि कर्वे यांच्या हिंगण्याच्या आश्रमात महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षकांचे दहा दिवसांचे शिबीरे होते. त्याला मी आणि माझे सहकारी श्री.लुद्रीक सर असे दोघे गेलो होतो. राजाभाऊ मंगळवेढेकर, शामला वनारसे, मामा क्षीरसागर, शांताबाई किर्लोस्कर आणि राजगुरु आदी नामवंत मार्गदर्शन करण्यासाठी आले होते.ते दहा दिव...

आठवणीतली माणसं ‐ 12

इमेज
गुरूवर्य आर.एस.कुलकर्णी - शिक्षक धर्माचे पालन करणारे आदर्श शिक्षक!      आयुष्यात कांही माणसं अशी येतात की,आपल्याला कायमची ऋणी करून सोडतात.ती आपल्या आयुष्याची कधीही न संपणारी शिदोरी बनून राहतात. आपलं जीवन कृतार्थ होतं.हा सुध्दा एक परमेश्वरी संकेत असतो.अशी माणसं मला लाभली हे माझे भाग्यच होय.अशा माणसांनीच मला समृद्ध केलं.संपन्न केलं.आयुष्याकडे कसे पहावे ते शिकवले.आणि योग असा की ,मी शिक्षक झाल्यावर तर या माणसांचं जीवनातील स्थान अक्षय झालं.त्यांच्याकडे पाहूनच धन्यता वाटावी अशी ही मौल्यवान माणसं हीच माझी श्रीमंती. त्यातलेच एक म्हणजे, " गुरूवर्य आर.एस.कुलकर्णी सर." होय.राष्ट्रसंत,अलौकिक प्रज्ञावंत, प्रचंड व्यासंगी आचार्य विनोबाजी भावे यांनी "शिक्षक-विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना लिहिलेले आहे की" विद्यार्थी, शिक्षक परायण असावा / शिक्षक विद्यार्थ्यी परायण असावा/दोघेही ज्ञान परायण असावेत/ज्ञान सेवापरायण असावे//" विद्यार्थी ज्ञान मिळविण्यासाठी तत्पर असावा. आपल्या शिक्षकांकडून किती शिकू आंणि काय शिकू अशी अवस्था असावी.तल्लीनतेने त्याने ज्ञान मिळवावे.शिक्षकाचीही अशीच अवस...

आठवणीतली माणसं ‐ 11

इमेज
थोर समाजशिक्षक व माझे सदगुरू - श्री. श्रीपाद नागेश जोशी ऊर्फ बंडामामा !       एकोणीसशे पन्नासचे दशक. मी ऊत्तूरला आजोळी राहत होतो. माझे वय पाचसहा असावे .त्यावेळची गोष्ट. दसरा झाल्यावर कोजागिरी पौर्णिमा झाली की वेध लागायचे ते दिवाळीचे.तसेच आणखी एका गोष्टीची ओढ असायची ती म्हणजे "विठ्ठल मंदिरातील काकडआरतीची. अजूनही मला ती ऊत्तूरातील विठ्ठल मंदिरातील काकड आरती अगदी स्पष्ट ऐकू येते.काकड आरतीचा संस्कार इतका खोलवर रूजला आहे की ,आपोआपच मन भूतकाळात जाते.ऊत्तूरला त्या काळात अद्यापही वीज आली नव्हती. संध्याकाळी अंधार पडू लागला की ग्रामपंचायतीचा शिपाई प्रत्येक गल्लीच्या कोपर्याला एक खांब असायचा त्या खांबावर एक कंदील असायचा तो लावण्याचे काम हा शिपाई करीत असे. एवढा उजेड सोडला तर सारे गांव मिट्ट काळोखात गुडुप्प होऊन गेलेले असायचे. पहाटे चारच्या सुमारास कोंबडा आरवला की गांव जागं व्हायचं. पण कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा हा महिना भर मात्र "काकड आरतीनं" जाग यायची.पहाटे चारच्या सुमारास माझी "आजी" जागी होऊन मला ऊठवायची आणि आंघोळ करून आम्ही दोघे त्या अंधारात कंदील घेऊन विठ्ठल...

आठवणीतील माणसं - 10

इमेज
पुस्तकवाले जोशी - श्री. रवींद्र जोशी! आपल्या आयुष्यात माणसं भेटणं याला काही प्रेरणा असावी लागते असे वाटते. कांही माणसं प्रत्यक्ष भेटल्यावर ती काही ऋणानुबंध घेऊन येतात. या सर्वामागे एक ईश्वरी प्रेरणा असते एवढं मात्र खरं. त्याच झालं असं की,मी ऊत्तूरला तिथल्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. साधारण पन्नास वर्षे झाली. मी नवखा होतो. एक दिवस सकाळी 11वाजता प्रार्थना झाली आणि मी माझ्या पहिल्या तासाला निघालो होतो. इतक्यात मागून हाक आली, "अहो,नाईक सर ,जरा ऑफिसमध्ये येता का? थोडं बोलायचं आहे. "आमचे बबनराव ठाकूर सर मला म्हणाले. म्हणून मी त्यांच्या मागून गेलो." एक पाच- साडेपाच फूटांची उंची असलेले, गोरेपान ,सरळ नाक ,केस अकाली पांढरे झालेले, पण मागे विंचरलेले, डोळ्यावर काळ्या फ्रेमचा चष्मा, पॅट व पांढरा शुभ्र हाप मॅनिला असे एक गृहस्थ ठाकूर सरांचे समोर खुर्चीवर बसले होते.ठाकूर सरांनी माझा त्यांच्याशी परिचय करून दिला, "हे आमचे नाईक सर, यांना साहित्याची आवड आहे." आणि समोरच्या गृहस्थांकडे वळून ते मला म्हणाले, हे रवींद्र जोशी सर .कोल्हापूरला असतात. मौज प्रकाशन गृह यांच...

आठवणीतली माणसं - 9

इमेज
आमच्या शाळेचा जागल्या - श्री. बबनराव ठाकूर! कधी कधी मी एकटाच असतो तेव्हा आपल्याला भेटलेल्या माणसांचे नमुने आठवून अचंबित होतो.किती वेगवेगळे स्वभावधर्म असलेली माणसें . पराकोटीचा द्वेष करणारी, तर कधी म्ऊमुलायम स्वभावाची असतात कांही कांही परोपकारी गंपू सारखी असतात. कांही मनांनी कणखर असतात. कधी छोट्याशा प्रसंगानं हळवी होणारी असतात. परखडपणे बोलणारे पण अंतरंगी फणसासारखे रसाळ असतात. अशा विविध रंगी, नाना कळा असलेल्या माणसांत एक माणूस माझ्या मनांत कायम लक्षात राहिलेला आहे.तो आपल्या आयुष्याचा भाग झालेला आहे. तसेच तो आमच्या शाळेच्या जीवनातील अविभाज्य घटक झालेला आहे. शाळेचा रखवालदारच (जागल्या ) म्हणा ना!!कुणीही न सांगता सर्वांच्या हाकेला धावून जाणारा असा हा हवाहवासा वाटणारा माणूस म्हणजे आमचे बबनराव ठाकूर. मुलांचे लाडके ठाकूर सर. या माणसाची माझी भेट झाली ती जवळ जवळ पन्नास वर्षांपूर्वी 1965/66 साल असावे.मी गडहिग्लजला काॅलेजला होतो. आठ पंधरा दिवसांनी सुट्टी मिळाली की ऊत्तूरला आजोळी येत असे. डिसेंबर महिना होता. थंडीचे दिवस होते. आमच्या आजोबांच्या घरी माडीवर ऊत्तूर विद्यालयातील दहावीचे विद्यार्थी अभ्यास...