पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारे उमेशराव आपटे !

इमेज
समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारे उमेशराव आपटे !           प्रिय श्री. उमेशराव व सौ. वैशाली ताई, सप्रेम नमस्कार. आज प्रथमच तुम्हाला लिहितो आहे. गेल्यावर्षी पासून "कोरोना महामारीच्या संकटाला " सगळे जग सामोरे जात आहे. हे संकट आता उग्र रूप धारण करीत आहे. अशावेळी कुणाचातरी विश्वासाचा आधार माणसाला हवा असतो. तो ज्याच्याकडून मिळतो त्यालाच श्रद्धावान माणूस "देवदूत" म्हणतो. असे देवदूत बनून तुम्ही उभयता मुमेवाडी ता.आजरा येथील "मुकुंदरावदादा आपटे कोविड सेंटर" वर अहोरात्र काम करीत आहात. या आजाराचे नुसते नाव ऐकले तरी काळजाचा ठोका चुकतो. अशा ठिकाणी अत्यंत धाडसाने आपण काम करीत आहात. खरंतर जीव धोक्यात घालणे म्हणजे काय ते आपल्याकडे पाहिल्यावर कळते. रक्ताची माणसे जवळ जायला घाबरतात तिथे तुम्ही धर्माचे "भाऊ बहिण " बनून सेवा करीत आहात. "सेवापरमो धर्मः" असे वचन आहे. या वचनाचा वस्तुपाठ म्हणजेच तुमचे काम. मी समाजसेवा करतो म्हणून समाजसेवा घडत नाही. तो रक्तातच गुण असावा लागतो. त्यासाठी त्यागही करावा लागतो. हे सारे संस्कार कै.मुकुंदरावदादा यांचेकडून आपल्याला मिळाले...

आठवणीतली माणसं - 18

इमेज
"करके देखो " हा म.गांधीजींचा संदेश शिक्षकांना देवून कार्यप्रवण करणारे कुशल प्रशासक - मुख्याध्यापक, म्हणजे - गुरूवर्य अ. वि. आजगावकर सर!  एक विलक्षण व्यक्तिमत्व. म.गांधीजींचा विचार, आचार्य विनोबाजींचा शिक्षक धर्म, आणि पू.सानेगुरुजींची आंतरभारतीची कल्पना रूजविण्याचा प्रयत्न करणारे दृष्ट्रे असे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय अ.वि.आजगावकर सर. ध्येयनिष्ठा, कर्मनिष्ठा आणि जीवननिष्ठा यांचे सुंदर दर्शन घडविणारे व्यक्तिमत्व म्हणजे अ.वि.आजगावकर. आयुष्यभर आपली निष्ठा प्राणपणाने जपणारे सर आज 91 व्या वर्षातही जीवननिष्ठा आचरत असल्याचे पाहून मनअचंबित झाल्याशिवाय राहत नाही. एखाद्या ऋषीकुळातील योग्यासारखी साधी जीवनपद्धती आजही ते अवलंबित आहेत.स्वार्थाचा जराही लवलेश त्यांना शिवलेला नाही. मी प्राथमिक शाळेत शिकत होतो त्यावेळची गोष्ट आहे.साधारण 1952/53 साल असावे. तेव्हा ऊत्तूरला माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. एवढेच नव्हे तर संपूर्ण आजरा तालुक्यात फक्त आजरा येथे एक शाळा होती. तसेच गडहिग्लज तालुक्यातही फक्त एक शाळा गडहिग्लजला होती. ऊत्तूर परिसरातील 30/35 खेड्यातील मुलं गडहिग्लज जवळ असल्यामुळे तिकडे जात अ...

आठवणीतली माणसं - 17

इमेज
निःष्काम कर्म हेच जीवन मानून आयुष्य समर्पित करणारे आदरणीय डॉ. सु.ब. देशमाने साहेब!!! ॠणानुबंधाच्या कुठून पडल्या गाठी | भेटीत तुष्टता मोठी || हे पं.कुमार गंधर्व यांनी गायिलेले गाणे अनेकवेळा ऐकले आहे. आजही ऐकतो. अशी आयुष्यात माणसं भेटतात आणि एकदा भेटली की ती आपलीशी कधी होतात हेही कळत नाही. अशा मोजक्या माणसांपैकी एक म्हणजे आदरणीय डॉ. सु.ब.देशमाने साहेब. ते आमच्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांना साहेब म्हणत होतो.पण आम्ही त्यांच्या परिवारातील सदस्य केव्हा झालो ते कळलेच नाही. तेव्हापासून आम्ही त्यांना "दादा" म्हणून संबोधू लागलो आणि परकेपणा गळूनच पडला. मी त्यांना पहिल्यांदा केव्हा पाहिले त्याचा विचार करू लागलो आणि लहानपणीचा तो प्रसंग आठवला. माझं बालपण आणि प्राथमिक शिक्षण ऊत्तूरलाच झालं. ऊत्तूरला माझ्या आजोबांचे घरासमोर बाजारपेठेत बापूसाहेब धुरे यांचे घर. डॉक्टरांचे जिवलग मित्र म्हणजे बापूसाहेब धुरे. डॉक्टर तेंव्हा शिक्षणासाठी पुण्याला होते.सुट्टीला ऊत्तूरला यायचे.असेच एका सुट्टीला ते ऊत्तूरला आले होते.मी प्राथमिक शाळेत तिसरीला होतो. एके दिवशी सकाळी नऊ वाजता डॉक्टर धुरे यांचे घ...

आठवणीतली माणसं - 16

इमेज
सहधर्मचारिणी  आज मी अगदी वेगळ्या विषयावर लिहिणार आहे. 27 मार्च हा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. अनेक अर्थांनी हा दिवस मला सतत आठवण देतो. त्यातला एक म्हणजे आमच्या सहजीवनाला सुरूवात झाली तो दिवस म्हणजे 27 मार्च होय. "27 मार्च 2021" आमच्या सहजीवनाला 45 वर्षे पूर्ण झाली तो दिवस.वार शनिवार. बरोबर 45 वर्षांपूर्वी ही म्हणजे " 27 मार्च 1976" या दिवशीही "शनिवार च" होता. हाही एक योगायोग. ही सहजीवनाची वर्षं आम्ही दोघांनी अत्यंत कष्टपूर्ण काढली. आणि सुफळ संपन्न बनवली.यात अर्थातच सर्वात मोठा वाटा माझ्या पत्नीचाच आहे.ती सतत सावलीसारखी माझ्याबरोबर राहिली म्हणून ते शक्य झाले. "महाभारतात यक्षाने "युधिष्ठीराला " विचारलेल्या प्रश्नामध्ये एक प्रश्न होता ---"देवाने पुरूषासाठी निर्माण केलेला उत्तम मित्र कोण?" त्याचे युधिष्ठीराने उत्तर दिले. "त्याची बायको "(पत्नी). हजारोवर्षापूर्वी घडून गेलेल्या महाभारतातील ही कथा आहे. आणि अगदी खरं आहे. आजही लागू पडते. संसारात पत्नीला अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात .पत्नी,भावजय ,नणंद, आई, ...