आठवणीतली माणसं - 7
गुरूराया आस तव दर्शनाची संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले | तेव्हा या विठ्ठले कृपा केली || आता लागली आस | गुरूराया तव आस दर्शनाची || इतके गुरूचे महत्व मानवी जीवनात आहे. त्यासाठी आपला दृढविश्वास असावा लागतो. संतश्रेष्ठ एकनाथ महाराज आपल्या अभंगात वर्णन करताना म्हणतात, गुरू परमात्मा परेशु | ऐसा ज्याचा दृढ विश्वासु || देव तयाचा अंकिला | स्वये संचरा त्याचे घरा || एका जनार्दनी गुरुदेव | येथे नाही बा संशय || आपल्या आयुष्यात गुरूचे स्थान अनन्यसाधारण आहे. पाच सप्टेंबर हा दिवस "शिक्षक दिनाचा" गुरूपूजनाचा!!आपल्या शिक्षकांना भेटून त्यांच्या ठिकाणी आपली श्रद्दा व्यक्त करण्याचा! जुन्या आठवणींना उजाळा देऊन साजरा करण्याचा हा दिवस. या निमित्ताने मला भेटलेल्या दोन गुरूंच्या या आठवणी....... 1960 सालचा तो काळ. मी ऊत्तूरला इयत्ता पाचवी झाल्यावर ...