पोस्ट्स

आठवणीतील माणसं - 10

इमेज
पुस्तकवाले जोशी - श्री. रवींद्र जोशी! आपल्या आयुष्यात माणसं भेटणं याला काही प्रेरणा असावी लागते असे वाटते. कांही माणसं प्रत्यक्ष भेटल्यावर ती काही ऋणानुबंध घेऊन येतात. या सर्वामागे एक ईश्वरी प्रेरणा असते एवढं मात्र खरं. त्याच झालं असं की,मी ऊत्तूरला तिथल्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. साधारण पन्नास वर्षे झाली. मी नवखा होतो. एक दिवस सकाळी 11वाजता प्रार्थना झाली आणि मी माझ्या पहिल्या तासाला निघालो होतो. इतक्यात मागून हाक आली, "अहो,नाईक सर ,जरा ऑफिसमध्ये येता का? थोडं बोलायचं आहे. "आमचे बबनराव ठाकूर सर मला म्हणाले. म्हणून मी त्यांच्या मागून गेलो." एक पाच- साडेपाच फूटांची उंची असलेले, गोरेपान ,सरळ नाक ,केस अकाली पांढरे झालेले, पण मागे विंचरलेले, डोळ्यावर काळ्या फ्रेमचा चष्मा, पॅट व पांढरा शुभ्र हाप मॅनिला असे एक गृहस्थ ठाकूर सरांचे समोर खुर्चीवर बसले होते.ठाकूर सरांनी माझा त्यांच्याशी परिचय करून दिला, "हे आमचे नाईक सर, यांना साहित्याची आवड आहे." आणि समोरच्या गृहस्थांकडे वळून ते मला म्हणाले, हे रवींद्र जोशी सर .कोल्हापूरला असतात. मौज प्रकाशन गृह यांच...

आठवणीतली माणसं - 9

इमेज
आमच्या शाळेचा जागल्या - श्री. बबनराव ठाकूर! कधी कधी मी एकटाच असतो तेव्हा आपल्याला भेटलेल्या माणसांचे नमुने आठवून अचंबित होतो.किती वेगवेगळे स्वभावधर्म असलेली माणसें . पराकोटीचा द्वेष करणारी, तर कधी म्ऊमुलायम स्वभावाची असतात कांही कांही परोपकारी गंपू सारखी असतात. कांही मनांनी कणखर असतात. कधी छोट्याशा प्रसंगानं हळवी होणारी असतात. परखडपणे बोलणारे पण अंतरंगी फणसासारखे रसाळ असतात. अशा विविध रंगी, नाना कळा असलेल्या माणसांत एक माणूस माझ्या मनांत कायम लक्षात राहिलेला आहे.तो आपल्या आयुष्याचा भाग झालेला आहे. तसेच तो आमच्या शाळेच्या जीवनातील अविभाज्य घटक झालेला आहे. शाळेचा रखवालदारच (जागल्या ) म्हणा ना!!कुणीही न सांगता सर्वांच्या हाकेला धावून जाणारा असा हा हवाहवासा वाटणारा माणूस म्हणजे आमचे बबनराव ठाकूर. मुलांचे लाडके ठाकूर सर. या माणसाची माझी भेट झाली ती जवळ जवळ पन्नास वर्षांपूर्वी 1965/66 साल असावे.मी गडहिग्लजला काॅलेजला होतो. आठ पंधरा दिवसांनी सुट्टी मिळाली की ऊत्तूरला आजोळी येत असे. डिसेंबर महिना होता. थंडीचे दिवस होते. आमच्या आजोबांच्या घरी माडीवर ऊत्तूर विद्यालयातील दहावीचे विद्यार्थी अभ्यास...

आठवणीतली माणसं - 8

इमेज
एका प्रज्ञासूर्याचे अलौकिक दर्शन! (राष्ट्रसंत आचार्य विनोबाजी भावे!)  प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कांही दुर्लभ योगही येतात. त्यामुळे जीवन उजळून निघते.अधिक संपन्न होते .असेच काही क्षण माझ्या आयुष्यात ही आले. गोष्ट आहे 65 वर्षांपूर्वीची. माझ्या बालपणीची. मी तेव्हा इयत्ता चौथीत शिकत होतो. त्यावेळचे ऊत्तूर हे अगदी छोटेसे गाव होते. आजरा तालुक्यातले . माझ्या आजोळचे वातावरण हे वारकरी संप्रदायाचे, धार्मिक. माझे आजोबा "पंढरीचे" "कार्तिकीचे "वारकरी.त्याच प्रमाणे" ह.भ.प. गणपतराव फारक " हे जवळच्या नात्यातले आजोबा "महिन्याचे वारकरी ".त्यामुळे भजन,कीर्तन, नामस्मरण यांनी वातावरण भारलेले होते. दररोज संध्याकाळी शाळेतून घरी आलो की आमच्या ओसरीवर "फारक आजोबा "आम्हां मुलांना भजन म्हणायला शिकवत असत ,अभंग पाठ करून घेत असत. साधारण 50/60 मुलं असत.एक तास भजन चालायचे.रात्री अभ्यास, जेवण झाले की,पुन्हा आजोबा रामायण, महाभारत, संतांच्या कथा सांगत असत. त्यामुळे भक्तिरसाने चिंब भिजलेले असे ते दिवस होते. त्यामुळे आपोआपच संतांची चरित्रे वाचणे,त्यांच्या जीवनातून काय बोध ...

आठवणीतली माणसं - 7

इमेज
गुरूराया आस तव दर्शनाची  संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे,          जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले | तेव्हा या विठ्ठले कृपा केली ||         आता लागली आस | गुरूराया तव आस दर्शनाची ||  इतके गुरूचे महत्व मानवी जीवनात आहे. त्यासाठी आपला दृढविश्वास असावा लागतो. संतश्रेष्ठ एकनाथ महाराज आपल्या अभंगात वर्णन करताना म्हणतात,         गुरू परमात्मा परेशु |    ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ||         देव तयाचा अंकिला |    स्वये संचरा त्याचे घरा ||         एका जनार्दनी गुरुदेव |  येथे नाही बा संशय ||  आपल्या आयुष्यात गुरूचे स्थान अनन्यसाधारण आहे. पाच सप्टेंबर हा दिवस "शिक्षक दिनाचा" गुरूपूजनाचा!!आपल्या शिक्षकांना भेटून त्यांच्या ठिकाणी आपली श्रद्दा व्यक्त करण्याचा! जुन्या आठवणींना उजाळा देऊन साजरा करण्याचा हा दिवस. या निमित्ताने मला भेटलेल्या दोन गुरूंच्या या आठवणी....... 1960 सालचा तो काळ. मी ऊत्तूरला इयत्ता पाचवी झाल्यावर ...

आठवणीतली माणसं - 6

 गुरूवंदना !!       आज "श्री गणेश चतुर्थी "चौदा विद्या व चौसष्ट कलांचा" जो अधिपती त्या मंगलमय गणेशा चे आगमन झाले आहे. सर्व विघ्नांचा नाश करणारा व सर्व सुखांचा वर्षाव करणारा असा तो गणपती. त्याला वंदन करुन आज मी माझ्या जीवनातील गुरुंना वंदन करणार आहे.      संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी गुरूला संतकुळीचा राजा म्हंटले आहे. गुरूचे अपूर्व असे वर्णन त्यांनी आपल्या अभंगात केले आहे. ते म्हणतात,  "गुरू हा संत कुळीचा राजा | गुरू हा प्राण विसावा माझा |  गुरूवीण देव दुजा | पाहता नाही त्रिलोकी ||1|| गुरू हा सुखाचा सागरू | गुरू हा प्रेमाचा आगरू | गुरू हा धैर्याचा डोंगरू | कदाकाळी डळमळीना ||2||  गुरू वैराग्याचे मूळ | गुरू परब्रह्म केवळ | गुरू सोडवी तात्काळ | गाठ लिंग देहाची ||3|| गुरू हा साधकासी साह्य | गुरू भक्तालागी माय |  गुरू हा कामधेनु गाय | भक्ताघरी दुभतसे ||4||  गुरू घाली ज्ञानांजन | गुरू दाखवी निजधन | गुरू सौभाग्य देऊन | साधुबोध नांदवी ||5|| गुरू मुक्तीचे मंडन | गुरू दुष्टांचे दंडन |  गुरू पापांचे खंडन | नानापरी वारीतस...

आठवणीतील माणसं - 5

इमेज
निर्मळतेचा झरा -- गुरूवर्य प्रा. विठ्ठल बन्ने !!!       1960/61 चा काळ असावा. आजरा तालुक्यातील "ऊत्तूर" या छोट्याशा गावात राष्ट्रसेवादलाच्या पदवीधर मित्रांनी "ऊत्तूर विद्यालय ऊत्तूर" या माध्यमिक शाळेची स्थापना केली. त्यावेळची प्रतिकूल परिस्थिती ,शाळा चालविण्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागायच्या, पण हे सर्व करण्यात एक आनंद होता.त्याचे कारण म्हणजे एकतर हे सर्व मित्र पू.साने गुरुजींच्या व राष्ट्रसेवादलाच्या विचाराने भारलेले होते. त्यांना मदत करायला जिल्ह्यातून मित्रमंडळी येत असतजमेल त्यापद्धतीने हातभार लावत होते.या सर्व तरूण मित्रांच्यापुढे "गांधीजींच्या खेड्याकडे चला" या मंत्राने भारावलेले विश्व होते.असेच एकदा एप्रिल महिन्यात ऊत्तूरला "शिक्षक-विद्यार्थी-पालक "यांचा मेळावा "आयोजित केला होता .खेड्यापाड्यातील शेतकरी, अडाणी पालक आपल्या मुलांसाठी आलेले होते.सगळी तयारी झाली आणि एवढ्यात, एक "साडे पाच ,सहा फूट उंची ,गव्हाळ रंग, गोल चेहरा, विलक्षण बोलके डोळे, अंगात सळसळणारा उत्साह ओसंडून वाहत होता असे ते गृहस्थ बोलायला ऊभे राहिले. सुरूवातीलाच त्यां...

आठवणीतली माणसं - 4

इमेज
गुरू माझा समर्थ - एम.एन.कुलकर्णी..........    साधारण 1962/63 साल असावे. संकेश्वरला गांधी चौकातील आमच्या घरी एका रविवारी दुपारी एक गृहस्थ अचानक आले. खादीची गांधी टोपी, खादीचाच हाप शर्ट,खादीचेच धोतर.आणि खांद्यावर घोंगडे, धारदार नाक, गव्हाळ रंग ,करारी नजर, बारीक चणीचे शरीर लाभलेले असे ते व्यक्तीमत्व होते. पायात साध्या वहाणा. आल्या आल्या त्यांनी धोंडोपंत आहेत का अशी विचारणा केली. धोंडोपंत ऊर्फ दादा हे माझे काका. सुप्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आणि संकेश्वर च्या एस.डी.हायस्कूलचै शिल्पकार मुख्याध्यापक. मी आत जावून दादांना सांगितले, त्यांचे वर्णन केले. त्याबरोबर दादा म्हणाले, बापूसाहेब आलेत होय ,असे म्हणत ते बैठकीच्या खोलीत आले.पुढे बराच वेळ त्यांच्या शिक्षणावर साहित्यावर खूप गप्पा झाल्या. त्यावेळी मला काही कळले नाही. पण आलेली व्यक्ती कांही साधी नाही एवढं जाणवलं. थोड्यावेळाने ते दादांना म्हणाले,"धोंडोपंत, आमच्या शाळेचे खेळाचे साहित्य, घटप्रभा रेल्वे स्टेशनवर रेल्वेपार्सलने आले आहे ,तेवढे दुंडगे येथील आमच्या शाळेकडे पोचवा. "आणि तसेच चहा,काॅफी काहीच न घेता निघून गेले. हे साहित्य दुंडग्याला प...