पोस्ट्स

आठवणीतली माणसं - 7

इमेज
गुरूराया आस तव दर्शनाची  संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे,          जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले | तेव्हा या विठ्ठले कृपा केली ||         आता लागली आस | गुरूराया तव आस दर्शनाची ||  इतके गुरूचे महत्व मानवी जीवनात आहे. त्यासाठी आपला दृढविश्वास असावा लागतो. संतश्रेष्ठ एकनाथ महाराज आपल्या अभंगात वर्णन करताना म्हणतात,         गुरू परमात्मा परेशु |    ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ||         देव तयाचा अंकिला |    स्वये संचरा त्याचे घरा ||         एका जनार्दनी गुरुदेव |  येथे नाही बा संशय ||  आपल्या आयुष्यात गुरूचे स्थान अनन्यसाधारण आहे. पाच सप्टेंबर हा दिवस "शिक्षक दिनाचा" गुरूपूजनाचा!!आपल्या शिक्षकांना भेटून त्यांच्या ठिकाणी आपली श्रद्दा व्यक्त करण्याचा! जुन्या आठवणींना उजाळा देऊन साजरा करण्याचा हा दिवस. या निमित्ताने मला भेटलेल्या दोन गुरूंच्या या आठवणी....... 1960 सालचा तो काळ. मी ऊत्तूरला इयत्ता पाचवी झाल्यावर ...

आठवणीतली माणसं - 6

 गुरूवंदना !!       आज "श्री गणेश चतुर्थी "चौदा विद्या व चौसष्ट कलांचा" जो अधिपती त्या मंगलमय गणेशा चे आगमन झाले आहे. सर्व विघ्नांचा नाश करणारा व सर्व सुखांचा वर्षाव करणारा असा तो गणपती. त्याला वंदन करुन आज मी माझ्या जीवनातील गुरुंना वंदन करणार आहे.      संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी गुरूला संतकुळीचा राजा म्हंटले आहे. गुरूचे अपूर्व असे वर्णन त्यांनी आपल्या अभंगात केले आहे. ते म्हणतात,  "गुरू हा संत कुळीचा राजा | गुरू हा प्राण विसावा माझा |  गुरूवीण देव दुजा | पाहता नाही त्रिलोकी ||1|| गुरू हा सुखाचा सागरू | गुरू हा प्रेमाचा आगरू | गुरू हा धैर्याचा डोंगरू | कदाकाळी डळमळीना ||2||  गुरू वैराग्याचे मूळ | गुरू परब्रह्म केवळ | गुरू सोडवी तात्काळ | गाठ लिंग देहाची ||3|| गुरू हा साधकासी साह्य | गुरू भक्तालागी माय |  गुरू हा कामधेनु गाय | भक्ताघरी दुभतसे ||4||  गुरू घाली ज्ञानांजन | गुरू दाखवी निजधन | गुरू सौभाग्य देऊन | साधुबोध नांदवी ||5|| गुरू मुक्तीचे मंडन | गुरू दुष्टांचे दंडन |  गुरू पापांचे खंडन | नानापरी वारीतस...

आठवणीतील माणसं - 5

इमेज
निर्मळतेचा झरा -- गुरूवर्य प्रा. विठ्ठल बन्ने !!!       1960/61 चा काळ असावा. आजरा तालुक्यातील "ऊत्तूर" या छोट्याशा गावात राष्ट्रसेवादलाच्या पदवीधर मित्रांनी "ऊत्तूर विद्यालय ऊत्तूर" या माध्यमिक शाळेची स्थापना केली. त्यावेळची प्रतिकूल परिस्थिती ,शाळा चालविण्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागायच्या, पण हे सर्व करण्यात एक आनंद होता.त्याचे कारण म्हणजे एकतर हे सर्व मित्र पू.साने गुरुजींच्या व राष्ट्रसेवादलाच्या विचाराने भारलेले होते. त्यांना मदत करायला जिल्ह्यातून मित्रमंडळी येत असतजमेल त्यापद्धतीने हातभार लावत होते.या सर्व तरूण मित्रांच्यापुढे "गांधीजींच्या खेड्याकडे चला" या मंत्राने भारावलेले विश्व होते.असेच एकदा एप्रिल महिन्यात ऊत्तूरला "शिक्षक-विद्यार्थी-पालक "यांचा मेळावा "आयोजित केला होता .खेड्यापाड्यातील शेतकरी, अडाणी पालक आपल्या मुलांसाठी आलेले होते.सगळी तयारी झाली आणि एवढ्यात, एक "साडे पाच ,सहा फूट उंची ,गव्हाळ रंग, गोल चेहरा, विलक्षण बोलके डोळे, अंगात सळसळणारा उत्साह ओसंडून वाहत होता असे ते गृहस्थ बोलायला ऊभे राहिले. सुरूवातीलाच त्यां...

आठवणीतली माणसं - 4

इमेज
गुरू माझा समर्थ - एम.एन.कुलकर्णी..........    साधारण 1962/63 साल असावे. संकेश्वरला गांधी चौकातील आमच्या घरी एका रविवारी दुपारी एक गृहस्थ अचानक आले. खादीची गांधी टोपी, खादीचाच हाप शर्ट,खादीचेच धोतर.आणि खांद्यावर घोंगडे, धारदार नाक, गव्हाळ रंग ,करारी नजर, बारीक चणीचे शरीर लाभलेले असे ते व्यक्तीमत्व होते. पायात साध्या वहाणा. आल्या आल्या त्यांनी धोंडोपंत आहेत का अशी विचारणा केली. धोंडोपंत ऊर्फ दादा हे माझे काका. सुप्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आणि संकेश्वर च्या एस.डी.हायस्कूलचै शिल्पकार मुख्याध्यापक. मी आत जावून दादांना सांगितले, त्यांचे वर्णन केले. त्याबरोबर दादा म्हणाले, बापूसाहेब आलेत होय ,असे म्हणत ते बैठकीच्या खोलीत आले.पुढे बराच वेळ त्यांच्या शिक्षणावर साहित्यावर खूप गप्पा झाल्या. त्यावेळी मला काही कळले नाही. पण आलेली व्यक्ती कांही साधी नाही एवढं जाणवलं. थोड्यावेळाने ते दादांना म्हणाले,"धोंडोपंत, आमच्या शाळेचे खेळाचे साहित्य, घटप्रभा रेल्वे स्टेशनवर रेल्वेपार्सलने आले आहे ,तेवढे दुंडगे येथील आमच्या शाळेकडे पोचवा. "आणि तसेच चहा,काॅफी काहीच न घेता निघून गेले. हे साहित्य दुंडग्याला प...

आठवणीतली माणसं - 3

इमेज
पुलंचा "नारायण" भेटला त्याची गोष्ट!!!                                                                                          जन्माला येणार्या माणसाचं एक प्रयोजन असतं. एक माणूस दुसर्या सारखा नसतो. एकाच आई वडीलांच्या पोटी जन्माला येणारी भावंडंही एकसारखी नसतात. प्रत्येक माणूस कांही प्राक्तन घेऊन येतो .माझ्या आयुष्यात भेटलेल्या आणि लक्षात राहिलेल्या माणसापैकी आज मी तुम्हाला एका माणसाबद्ल सांगणार आहे. हा माझ्या संपर्कात आला आणि मला पुलंचा तो अविस्मरणीय  "नारायण च" भेटला.गोष्ट आहे सन 1987 सालातील. म्हणजेच जवळपास 33 वर्षांपूर्वीची.मी ऊत्तूर विद्यालयात शिक्षक म्हणून काम करत होतो त्यावेळची.जून महिना. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं. या वर्षी माझ्याकडे इयत्ता आठवी चा वर्ग शिक्षक म्हणून काम आले.पहिले दहा बारा  दिवस ओळखी होण्यात गेले. मुलांना वह्या,पुस्तकं ,यांची यादी ...

आठवणीतली माणसं - 2

पुस्तक वेडा - प्रशांत!  प्रत्येक माणसाला कशाचं ना कशाचं तरी वेड असतं. असं वेड असल्याशिवाय माणूस घडत नाही. जीवनाला आकार येत नाही. अनेक प्रकारचे वेड असत.कुणाला बाग कामाचं, कुणाला वर्तमानपत्रातली विषयवार कात्रणे काढून फाईली करण,कुणाला दुसर्याला ऊपयोगी पडण्याची सवय,अशी नाना तर्हेची वेड असणारी माणसं आपल्या अवतीभवती असतात आणि इतरांचे लक्ष वेधून घेतात.आपल वेड जपण्यासाठी ही माणसं पराकोटीचा त्यागही करायला तयार असतात.आणि खरं सांगू,कांही तरी सोडल्याशिवा य वेडं होता येत नाही. या वेडानं त्या माणसाला आत्मानंद मिळवून दिलेला असतो. अशी अनेक वेडी माणसं मला आजपर्यंत अनेक भेटली. त्यातलाच एक माणूस म्हणजे " पुस्तक वेडा- प्रशांत ""!!मी ऊत्तूर विद्यालय, ज्युनियर काॅलेज ऊत्तूर मध्ये 33/34 वर्षे अध्यापन केलं.याच काळात हा "पुस्तक वेडा भेटला." साधारण 1994/95 चे वर्ष. इयत्ता अकरावीचा वर्ग. नवीन वर्ष नुकतच सुरू झालं होतं.आजूबाजूच्या खेड्यातून मुलंमुली आमचेकडे येत असत. सकाळी साडे सात वाजता आमचे काॅलेज सुरू होत असे. अकरावीच्या वर्गात कला व वाणिज्य मिळून 150/170 विद्यार्थी-विद्यार्थीनी असत.10 ...

आठवणीतली माणसं - 1

 जंबू गुरुजी साधारण 65 वर्षांपूर्वीचा काळ. मला सहा वर्षे झाली म्हणून माझ्या आजोबांनी शाळेत घालावयाचे ठरविले. ऊत्तूर हे माझे आजोळ. त्यावेळी चारपाच हजार लोकसंख्या असावी. सरकारी शाळेची एक लहानशी इमारत होती. पण आमचे वर्ग गावातल्या मंदीरात भरत असत. माझा पहिलीचा वर्ग महादेवाच्या मंदीरात भरत होता. जून महिन्यात एके दिवशी आजोबांनी घरात सांगून टाकले की, राजाला शाळेत घालावयाचे ठरविले आहे. तयारी करा. हे ऐकून मी रडायला लागलो.आजीजवळ हट्ट धरला. पण आजोबांपुढे कोणाचेच काही चालले नाही. आजोबांनी हौसेनं नवी पिशवी, नवी कोरी पाटी, अंकलिपी, पेन्सिली चा एक बाॅक्स, पट्टी, नवा ड्रेस, जरीची टोपी, पाटी पूजनाचे साहित्य, हे सगळे साहित्य आणले. सकाळी लवकर आंघोळ केली, पिशवी भरली, न्याहरी उरकली व तयार झालो. आजोबांनी घरातल्या देवाला नमस्कार करायला सांगितलं, नंतर घरातील वडील मंडळींना नमस्कार केला व आजोबांचे बोट धरून मी घरातून बाहेर पडलो. सकाळचे साडेदहा वाजून गेले होते. घराजवळच महादेवाचे मंदीर असल्यामुळे पाच मिनिटातच मंदीरात पोचलो. मंदीराच्या आवारात माझ्याच वयाची मुलं खेळत होती. ते पाहून मला जरा बरं वाटलं अकरा वाजता प...