आठवणीतली माणसं - 6
गुरूवंदना !! आज "श्री गणेश चतुर्थी "चौदा विद्या व चौसष्ट कलांचा" जो अधिपती त्या मंगलमय गणेशा चे आगमन झाले आहे. सर्व विघ्नांचा नाश करणारा व सर्व सुखांचा वर्षाव करणारा असा तो गणपती. त्याला वंदन करुन आज मी माझ्या जीवनातील गुरुंना वंदन करणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी गुरूला संतकुळीचा राजा म्हंटले आहे. गुरूचे अपूर्व असे वर्णन त्यांनी आपल्या अभंगात केले आहे. ते म्हणतात, "गुरू हा संत कुळीचा राजा | गुरू हा प्राण विसावा माझा | गुरूवीण देव दुजा | पाहता नाही त्रिलोकी ||1|| गुरू हा सुखाचा सागरू | गुरू हा प्रेमाचा आगरू | गुरू हा धैर्याचा डोंगरू | कदाकाळी डळमळीना ||2|| गुरू वैराग्याचे मूळ | गुरू परब्रह्म केवळ | गुरू सोडवी तात्काळ | गाठ लिंग देहाची ||3|| गुरू हा साधकासी साह्य | गुरू भक्तालागी माय | गुरू हा कामधेनु गाय | भक्ताघरी दुभतसे ||4|| गुरू घाली ज्ञानांजन | गुरू दाखवी निजधन | गुरू सौभाग्य देऊन | साधुबोध नांदवी ||5|| गुरू मुक्तीचे मंडन | गुरू दुष्टांचे दंडन | गुरू पापांचे खंडन | नानापरी वारीतस...